Laxman Hake : बारामतीची निवडणूक बिनविराेध हाेणे अवघड, लक्ष्मण हाके लढण्याच्या तयारीत

विशेष प्रतिनिधी

पुणे : Laxman Hake माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी पाेटनिवडणूक हाेणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक बिनविराेध करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने बिनविराेधचे प्रयत्न फाेल ठरणार आहेत.Laxman Hake

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवणारअसून, अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे.Laxman Hake



मात्र ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका विधानामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके हे आज बारामती विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके यांनी अनेक गावांना भेट दिली. तसेच बारामतीमधील विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करत असल्याने लक्ष्मण हाके यांनी सांगितले.या संदर्भात हाके म्हणाले की, आम्ही बारामतीमधील वाड्या वस्त्यांना भेट दिली आहे.

निवडणूक लढवली पाहिजे म्हणून शेकडो तरुण कार्यकर्त्यांचे फोन आले आहेत. मात्र त्यांच्या मनात काय नक्की आहे, हे अधिक जाणून घ्यायला मला आवडेल. याबाबत एक दोन दिवसांमध्ये आम्ही जाहीर भूमिका घेऊ, असे हाके यांनी सांगितले.मी ओबीसींच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. संविधानिक बाजू मांडत आहे. काही आंदोलने करतोय. बारामती मला नवीन नाही. बारामतीमधील प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये खेड्यामध्ये मी आधी जाऊन आलेलो आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीचं महत्त्व काय असतं, हे आम्ही लोकांना समजावून सांगू, असेही हाके यावेळी म्हणाले.

Baramati election unlikely to be unopposed, Laxman Hake prepares to contest

महत्वाच्या बातम्या