विशेष प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीमुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत.पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या कार्यकारणीच्या यादीत पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचे नाव नसल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या यादीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि जनरल सेक्रेटरी म्हणून खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे देखील नावे आहेत.मात्र,सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या पक्षातील मोठ्या नेत्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
काल रात्रीपासून जाहीर झालेली यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असून,अनेक अंदाज बांधले जात आहेत.मात्र,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून पोस्ट करत चर्चांना विराम दिला आहे.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
जाहीर करण्यात आलेल्या यादी संदर्भात चर्चांना उधाण आलेले असतानाच, सुनेत्रा पवार यांनी एक एक्स पोस्ट केली आहे.सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की,’ माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक चूक असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल ‘ असं स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षात अंतर्गत वादावर चर्चा..
मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या यादीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचा चर्चचा आता अधिक उधाण आले आहे.
Big faces out of NCP executive? Sunetra Pawar’s first reaction
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध