विशेष प्रतिनिधी
पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, पुण्यात भाजपने मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट व अजित पवार गट) तसेच ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे पुण्यातील विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (शरद पवार गट) यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच अजित पवार गटातील माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, सचिन दोडके यांचाही समावेश आहे. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडला.
पुण्यातील एकूण नऊ ते अकरा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यात माजी महापौरांचे नातेवाईक, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पक्षप्रवेश सुरू असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या काही इच्छुक कार्यकर्त्यांनी विरोध नोंदवत आंदोलन केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत काही प्रवेशांना विरोध झाला. मात्र पक्ष नेतृत्वाने हा विरोध झुगारून पक्षप्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
पुण्यामधील नऊ जणांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये सुरेंद्र पठारे, विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, सतिश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे, पायल तुपे, सचिन दोडके यांचा समावेश आहे. तर, अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला, यामध्ये माजी महापौरांच्या मुलासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरांचा ही समावेश आहे.
संजोग वाघेरे (शहराध्यक्ष, ठाकरे गट), उषा वाघेरे (माजी स्थायी समिती अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाकर वाघेरे (माजी उपमहापौर), प्रशांत शितोळे (माजी अध्यक्ष, स्थायी समिती), नवनाथ जगताप (माजी अध्यक्ष, स्थायी समिती, शरद पवार गट), राजू मिसाळ (माजी उपमहापौर), समीर मासुळकर (माजी नगरसेवक), रवी लांडगे (माजी नगरसेवक, ठाकरे गट), जालिंदर शिंदे (माजी नगरसेवक, अजित पवार गट), अमित गावडे (माजी नगरसेवक, ठाकरे गट), संजय काटे (माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते), मीनल यादव (माजी नगरसेविका, ठाकरे गट), कुशाग्र कदम (मुलगा, माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा), प्रसाद शेट्टी (माजी नगरसेवक, अजित पवार गट), विनोद नढे (माजी नगरसेवक, अजित पवार गट) यांचा यामध्ये समावेश आहे.
सुरेंद्र पठारेंच्या प्रवेशाने पूर्व भागातील नेत्यांना ‘संदेश’
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीमध्ये प्रवेश केलेले आणि निवडणूक जिंकलेले आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. वडिलांच्या विजयात सुरेंद्र यांचा मोठा वाटा होता. सुरेंद्र कदाचित राष्ट्रवादीकडून विधानसभेला लढतील अशी शक्यता देखील त्यावेळी वर्तवली जात होती. मागील, महिन्यांपासून सुरेंद्र पठारे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. शेवटी त्या चर्चा थांबल्या असून अखेर त्यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. पुण्याच्या पूर्व भागात सुरेंद्र यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
दोडकेंच्या प्रवेशावरून मोहोळ-तापकीर वाद?
भाजपाच्या काही नेत्यांचा विरोध असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनाही भाजपात प्रवेश देण्यात आल्याने अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस निवडणूक लढविणारे, शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे विश्वासू समजले जाणारे सचिन दोडके यांनी देखील भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाला आमदार भीमराव तापकीर यांचा विरोध होता. मात्र, त्यांना भाजपात आणण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षामध्ये दोडके यांच्या प्रवेशावरून मोहोळ आणि तापकीर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती, अशी चर्चा आहे.
BJP’s shock to Thackeray group along with both NCP groups in Pune; Many former corporators join the party
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला