मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे संचालक व्हायला निघालेत, चंद्रराव तावरे यांचा अजित पवारांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकपदासाठी लढत आहेत. वयाचा मुद्दा उपस्थित करत ज्येष्ठ सहकारी नेते चंद्रराव तावरे यांच्यावर पवारांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, असा टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी काल एका सभेत बोलताना मी चांगले काम करेन, की 85 वर्षांचा? असा सवाल करत चंद्रकांत तावरे यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत. यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला आहे. ते म्हणाले, अजित पवारांना जर लोकांचे कल्याण करायचे होते तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केले नाही? अजित पवारांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत?



तावरे म्हणाले की, माझे वय 85 वर्षे आहे, खासदार आणि आमदार निवडणुकीत मुंबईपर्यंत मला घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांना सांगितले यांना सांगा तरच माझ्या पत्नीचा फॉर्म भरतो. त्यावेळेस माझे म्हातारपण चालले. कालपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही चेअरमन व्हा यासाठी माणसं पाठवली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी होते. तुम्हीच चेअरमन व्हा आणि संचालक मंडळ निवडा आपण एकत्र येऊ, यासाठी माणसं पाठवली जात होती.

अजित पवार सभेत बोलताना म्हणाले होते की, अजित पवारला पैशाची गरज नाही, बापजाद्यांच्या कृपेने माझे चांगले चालले आहे, मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगले काम करेन की 85 वर्षांचा चांगला काम करेल? जर चेअरमन मीच असेल, तर साखर आयुक्त किंवा सहकार मंत्री काय करेल? मी चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन. संचालक चुकला तर मी आहे, मला काय करायचे ते मी करेन, असे म्हणत त्यांनी कारखाना सभासदांना आपल्या पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन केले.

Chandrarao Taware targets Ajit Pawar for leaving his desire to become the Chief Minister and becoming the director of a sugar factory

महत्वाच्या बातम्या