Elections : सहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, आता मतदान २० डिसेंबरला

विशेष प्रतिनिधी

पुणे: Elections न्यायालयीन अपीलांवरील निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची, तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड या सहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व नगरपरिषदांसाठीचे मतदान आता २० डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.Elections

राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले की ज्या जागांसाठी अपील दाखल होते आणि त्यांचे निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागले, त्या जागांसाठी पूर्वनिश्चित ४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेता येणार नाहीत. अध्यक्षपदाचा समावेश असलेल्या प्रकरणांत संपूर्ण नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.Elections



बारामती आणि फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासोबतच काही सदस्य जागांसाठीचे निकालही मुदतीनंतर लागल्याने या दोन्ही नगरपरिषदांच्या पूर्ण निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड नगरपरिषदांच्या काही सदस्य जागांचे निर्णयही विलंबाने लागल्यामुळे त्यांच्यासाठीदेखील नवा मतदान दिनांक निश्चित करण्यात आला आहे.

आता कोणत्याही उमेदवाराला नव्याने नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. फक्त नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाणार असून संबंधित क्षेत्रात त्याची योग्यप्रकारे प्रसिध्दी केली जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

Elections to six municipal councils postponed, voting now on December 20

महत्वाच्या बातम्या