Pramod Anna : प्रमोदअण्णा वर अन्याय.. ज्येष्ठ नागरिकांच्या भावना

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pramod Anna प्रमोद अण्णा तुझ्यावर अन्याय झाला… आम्ही फक्त तुलाच मत देणार… अण्णा आम्ही तुझ्यासोबत आहोत… अशा शब्दात प्रमोद निम्हण यांच्या प्रचारावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी निम्हण यांना आशीर्वाद दिला.Pramod Anna

प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार प्रमोद निम्हण यांच्या प्रचारादरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रमोद निम्हण यांना अशाप्रकारे आशीर्वाद दिले.



प्रभाग क्रमांक ९ मधून प्रमोद निम्हण राष्ट्रवादी कडून इच्छूक होते. परंतु अमोल बालवडकर यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंतांचे तिकीट कापले गेले. चांदेरे यांच्यामुळपक्षाची प्रतिमा वारंवार मालिन झाली आहे. असे असतानादेखील या दोघांना तिकीट देण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्ते आणि प्रभागातील जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. प्रमोद निम्हण आणि त्यांच्या पत्नी दोघेही नगरसेवक असताना गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. पाषाण सह आजूबाजूच्या गावातील नागरीकांनी निम्हण दाम्पत्यांनी केलेला विकास बघितला आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांची प्रमोद निम्हण यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालयाची भावना आहे. त्यामुळे या अन्यायाचा बदला मतपेटीतून दाखवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

प्रभागातील ७० वर्षांच्या आजींनीदेखील ‘ अण्णा तुझ्यावर अन्याय झालाय, असे म्हणत आमचे मतदान तुलाच या शब्दात आशीर्वाद दिला.

Injustice against Pramod Anna..Senior citizens’ feelings

महत्वाच्या बातम्या