विशेष प्रतिनिधी
संभाजीनगर: टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मुख्य आरोपी निदा खानला आसरा देणाऱ्या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तांवर महापालिकेनं हातोडा चालवला आहे.नारेगाव येथील २ घरं आणि एक ऑफिस जमीनदोस्त करण्यात आले.यावेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाचे हार घालून आणि फुले उधळून स्वागत मतीन पटेलच्या कुटुंबाने केले.यावेळी मतीन पटेलांच्या लहान मुलीने आपले अधिकाऱ्यांना घटनेची प्रत भेट देऊन, अशी कारवाई सगळीकडे करण्याची मागणी केली.
कारवाईची माहिती मिळताच एमआयएम चे माजी खासदार इम्तियाज जलील आणि काही नगरसेवकांनी रात्रीच नरेगावात मोठा जमाव एकत्र केला.सकाळपर्यंत अनेक कार्यकर्ते मतीन पटेल यांच्या घर आणि ऑफिस परिसरात जमले होते.बुधवारी सकाळी महापालिकेकडून मोठ्या नियोजनाने कारवाई करण्यात आली.
जलीलांचा घर पुन्हा उभारण्याचा शब्द..
माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की,’ राज्यात गुंडाराज चालू आहे. संभाजनगरचे पालकमंत्री स्वतः गुंडाराज असल्यासारखे वागतात,मतीन पटेल यांचे राहते घर पडायला माझासोबत नागरिकांनी देखील विरोध केला,मात्र मी मतीन पटेल यांना सांगितलं आहे की, तुमचे घर पुन्हा उभारले जाईल आणि त्याची जबाबदारी आम्ही घेतो ‘.
Matin Patel’s house and office demolished; Jalil’s words: ‘We will rebuild the house’..
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी