विशेष प्रतिनिधी
पुणे: Sinhagad Road पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कोयता गॅंगने एका १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शहराच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.Sinhagad Road
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, करण गिरीश काशीद (१९) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी एकत्र येऊन करणवर कोयत्याने वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.Sinhagad Road
बघाबघीचा वाद ठरला जीवावर!
या हत्येमागील कारण अत्यंत शुल्क असून ते धक्कादायक आहे. जानेवारी महिन्यात मयत करण आणि आरोपी मुलांमध्ये ‘एकमेकांकडे रागाने बघण्याच्या’ (बघाबघी) कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याचवेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक आणि भाचाभाची झाली होती. तोच राग मनात धरून या अल्पवयीन आरोपींनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले आणि करणचा रक्तरंजित अंत केला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. डीसीपी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार:
* पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली होती.
* या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
* पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट:
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात ‘कोयता गॅंग’चा हैदोस थांबता थांबत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणावरून हत्या होणे हे सामाजिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर आणि विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या या हिंसक प्रवृत्तीवर कडक आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पुणे पोलीस प्रशासन आता या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ अटक करून न थांबता, शहरात पोलिसांचा धाक निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे.
Murder Over a Mere Scuffle: 19-Year-Old Karan Brutally Killed on Sinhagad Road; Accused Arrested!
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास