विशेष प्रतिनिधी
पुणे : Nomination पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडे इच्छुकांची मोठी संख्या होती. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी एकाही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने शेवटच्या दोन दिवसांत सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडाळी झाली. युती आणि आघाडीतही अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उदभवल्याने गुपचूप एबी फॉर्मचे वाटप करावे लागले. त्यामुळी निवडणूक अधिकारी कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज खरेदीसाठी आणि तीन वाजल्यानंतरही अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील पंधराही निवडूण अधिकारी कार्यालयात संध्याकाळी उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती.Nomination
महापालिकेच्या १६५ जागांसाठी १० हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तब्बल ९ वर्षांनी निवडणूक होत असल्याने आणि राजकिय पक्षांची संख्या वाढल्याने सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याचा कालावधी देखिल कमी असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणते पक्ष असतील याच्या घोषणेबाबत उमेदवारी अर्जाची मुदत संपेपर्यंत मोठयाप्रमाणावर गोंधळ झाला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होईल असे बोलले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत ही युती होऊ शकली नाही. तर जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्रित लढणार आहे. यासोबतच वंचित, आम आदमी पार्टी व अन्य पक्ष व अपक्षही मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढणार असल्याने शहरातील १५ निवडणूक अधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होतीNomination
अनेकांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या भरवशावर अगोदरच पक्षाच्या नावाने आणि अपक्ष असे अर्ज भरत पक्षाच्या बंडाळी टाळण्याच्या धोरणाला सुरूंग लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अखेरच्या दिवशी स्वपक्षाचा एबी फॉर्म अथवा दुसºया पक्षात प्रवेश करून मिळालेल्या एबी फॉर्म भरणार्यांची संख्या देखिल आज मोठी राहीली. काही निवडणूक कार्यालयात तर इच्छुकांनी तिथेच नव्याने फॉर्म खरेदी करून आवारातच उपस्थित राहून फॉर्म भरले. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने अनेकांनी धोका टाळण्यासाठी निवडणूक कार्यालयाच्या आवारातच कार्यकर्त्यांमार्फत कागदपत्रांची जुळणी केली. यामुळे दुपारी तीन वाजल्यानंतरही निवडणूक कार्यालयाच्या आवारात पंचवीस ते तीस उमेदवार होते. त्यांना निवडणूक अधिकाºयांनी टोकन दिले. अर्जांची छाननी करून ते स्वीकारण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे प्रशासनाचीही चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटच्या दिवशी सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केले. मात्र, यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात होती. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंडखोरांना थोपविण्यासाठी राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता मागच्या दाराने उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची खेळी खेळली आहे. साहजिकच अर्ज दाखल करायचा दिवस उजाडत आला तरी आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही याचा उमेदवारांना थांगपत्ता नव्हता. मात्र, रविवारी मध्यरात्रीपासून अनेक पक्षांनी उमेदवारांना गुपचूप बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्याने काहींनी सोमवारी तर उर्वरित सर्व इच्छुकांनी हलगीचा कडकडाट जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल केले. त्यामुळे सर्वच क्षेत्रीय कार्यालयालांना जत्रेचं स्वरूप आले होते.
Nomination Rush on Final Day, Applications Accepted Late Into Evening With Token System
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत