विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभरातील संघटनात्मक बदलांना वेग देत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे.काँग्रेसच्या ‘ संघटन सृजन ‘ अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या या नियुत्यांमुळे पुणे काँग्रेसमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
पुणे काँग्रेसच्या पूर्व विभागाच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रशांत जगताव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिप्ती चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची निवड करण्यात आली असून पुणे ग्रामीण काँग्रेसच्या उत्तर विभागासाठी कमलाकर सातव आणि दक्षिण विभागासाठी लहू निवांगुने यांची निवड करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून अरविंद शिंदे यांच्याकडे पुणे शहराध्यक्ष पदाच्या प्रभारी कार्यभार होता. नवऱ्याने युक्त करण्यात आलेल्या प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांनी पूर्वी पुणे महापौर पदाची जबाबदारी सांभाळली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदी महिला नेतृत्वाला संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधी मोहिमे अंतर्गत या नियुक्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन शहराध्यक्ष पदाच्या धर्तीवर पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय काँग्रेसचा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधी विनोद सुलतानपूर यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून याबद्दल घेतली होती. आंध्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंतिम मंजुरी दिली.
नवीन नियुक्त्या कोणत्या?
प्रशांत जगताप: पुणे पूर्व विभाग शहराध्यक्ष
दीप्ती चौधरी: पुणे पश्चिम विभाग शहराध्यक्ष
नरेंद्र बनसोडे: पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष
ग्रामीण
कमलाकर सातव: उत्तर विभाग अध्यक्ष
लहू निवांगुणे: दक्षिण विभाग अध्यक्ष