विशेष प्रतिनिधी
पुणे : Murlidhar Mohol महापालिकेमध्ये २०१७ पूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांनी पुणेकरांची निराशा केली. त्यामुळे पुणेकरांनी शहराचा कारभारी बदलून भाजपला सत्ता दिली. आम्ही सत्ताकाळात पुणेकरांसाठी विकास कामे केल्याने या निवडणुकीत पुणेकरांना नवीन कारभारी नको आहे, असे उत्तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना दिले आहे.Murlidhar Mohol
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोर चढत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीतील प्रमुख पक्ष आमने सामने आहेत. दोन्ही शहरात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) मध्ये प्रमुख लढत आहे. त्यामुळे भाजपचे विविध नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दोन्ही महापालिकांमधील सत्ताधारी भाजपने विकास कामे न करता भ्रष्टाचार केला असून शहराच्या कारभाऱ््यांनी केवळ कामांमध्ये रिंग करून हव्या त्या ठेकेदाराला कामे देऊन पैसे कमवल्याचा आरोप करत अजित पवार कारभारी बदला असे आवाहन वारंवार करत आहेत.Murlidhar Mohol
या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना उत्तर दिले. त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली. मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे पुणेकर या महापालिका निवडणुकीत आम्हाला पुन्हा सत्ता देणार आहेत, त्यांना नवीन कारभारी नको आहे.
Pune Doesn’t Want a New Boss, Murlidhar Mohol Hits Back at Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- प्रभाग २५ मध्ये भाजपा उमेदवारांचा घरोघरी संपर्क दौरा
- तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू, बिनविराेधवरील टीकेवर मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबाेल
- Ashish Shelar : सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा
- छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे ! केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या विधानाने महाराष्ट्रात संताप