तटकरे – पटेल वेगळ्या तयारीत; रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

विशेष प्रतिनिधी

पुणे:राज्यातील महायुतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही प्रमुख नेत्यांचे नाव यादीतून गायब झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भर घातली आहे. अजित पवार गटातील तब्बल २२ आमदार आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढू शकतात, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ अजित पवार गटातील आमदारांबाबतच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील काही आमदारही भाजपकडे जाऊ शकतात, असे विधान रोहित पवार यांनी केला आहे.



रोहित पवार म्हणाले की, ‘ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदार घेऊन भाजपामधून निवडून लढणार आहेत.सोबतच शिवसेना एकदनाथ शिंदेच्या गटाचे देखील अनेक आमदार हे भाजपाच्या ट्रॅप मध्ये अडकले आहेत.पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके हे देखील भाजपाकडून निवडणूक लढवणार असल्याचे खळबळजनक दावे रोहित पवार यांनी केले आहेत.

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी फोडणार?

राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचे नाव राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीतून वगळल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हरओक निवासस्थानी भेटली घेतली,या भेटीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे काही वेगळा निर्णय घेत आहेत का? अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यातच आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की, ‘ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षातील 22 आमदार घेऊन भाजपकडून निवडणूक लढवू शकतात’ या द्यावामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Tatkare – Patel preparing separately; Rohit Pawar’s statement creates a stir

महत्वाच्या बातम्या