Pranjal Khewalkar पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याला अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : हनी ट्रॅपवरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आरोप करत असताना त्यांच्या जावयालाच महिलांसोबत रेव्ह पार्टी करताना ताब्यात घेण्यात आले आहे. Pranjal Khewalkar

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही रेव्ह पार्टी सुरू होती. एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरु होते. खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे.


  • राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी छापा टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, यासंदर्भातील मला तुमच्याकडूनच माहिती मिळत आहे. राजकीय कारवाईचा वास येत आहे का? अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे. त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही. यामध्ये षड्यंत्र असल्यास समोर आले पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

Police raid rave party in Pune, Eknath Khadse’s son-in-law Pranjal Khewalkar arrested

महत्वाच्या बातम्या