विशेष प्रतिनिधी
पुणे. : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (सकुंडे वस्ती)गावच्या हद्दीत रीलस्टार प्रतीक राम शिंदे याच्या चारचाकीमुळे भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निखील बाळासाहेब होले आपल्या क्रेटा गाडीतून महामार्गावरून जात होते. त्यावेळी रीलस्टार प्रतीक शिंदे याची भरधाव फॉर्च्युनर आली. फॉर्च्युनरनं क्रेटाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, क्रेटा पुढे असलेल्या मारूती वॅगनरवर आदळली. या भीषण अपघातात तिन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
तीनही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक आणि पोलिसांनी मदतकार्य केले. सुदैवाने या भीषण अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या प्रकरणी प्रतीक शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Reel star Prateek Shinde’s Fortuner collides with three cars
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल