विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : Karnataka MLA काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयाेगावर मतचाेरीचे आराेप करत आहेत. मात्र, कर्नाटकातील न्यायालयाने दिलेल्या एका निकालाने मतचाेरीचा मुद्दा काॅंग्रेसच्या आमदारावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांनी मतमाेजणीत केलेल्या गडबडीची दखल घेऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने फेरमतमाेजणीचे आदेश दिले आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाने मालूर विधानसभा मतदारसंघातील निकाल रद्द केल्याने काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांना मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मालूर विधानसभा मतदारसंघातील निकालावर संशय घेत भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांनी काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांच्यावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यानंतर सुमारे २ वर्षांनी हायकोर्टाने आपला निकाल सुनावताना मतमोजणी प्रक्रियेतील कथित गडबड विचारात घेऊन पुन्हा मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. Karnataka MLA
तसेच ही मजमोजणी पुढील चार आठवड्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यावेळी जिल्हा मतदान आयुक्त मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडीओ सादर करण्यात अयशस्वी ठरले होते. मालूर विधानसभा मतदारसंघ हा कोलार लोकसभा मतदारसंघात येतो. तसेच हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथे आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने चार वेळा बाजी मारली आहे. तर भाजपाने २ वेळा आणि जेडीएसने एकदा येथे विजय मिळवला होता.
दरम्यान, मे २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मालूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांचा नानजेगौडा यांनी केवळ २४८ मतांनी पराभव केला होता. येथे अपक्ष उमेदवार विजय कुमार यांनी घेतलेली मते निकालांमध्ये निर्णायक ठरली होती. दरम्यान, निकाल लागल्यानंतर एक आठवड्याच्या आत मंजुनाथ यांनी कोर्टात धाव घेत निकालाला आव्हान दिले होते. Karnataka MLA
The Congress will be blamed for the vote rigging, the Karnataka MLA’s post will be threatened by the court’s order for re-election
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!