Agriculture Minister : पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे, शेतकऱ्यांना मदतीचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

अकोला : Agriculture Minister राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.Agriculture Minister

जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.Agriculture Minister



राज्यात सध्या युरियाचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून, लवकरच शेतकऱ्यांसाठी “चांगली बातमी” दिली जाईल, असे आश्वासनही कृषिमंत्र्यांनी दिले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील रिक्त पदांबाबत पुढील दोन महिन्यांत ठोस निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी सांगितले. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून विद्यापीठ प्रशासन आणि सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांची दखल घेत सरकार निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले

Immediate assessment of agricultural damage after rains stop, Agriculture Minister assures help to farmers

महत्वाच्या बातम्या