ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही हे परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

नागपूर : ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. Nitin Gadkari

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार आहे. उत्तरेतील राज्यांप्रमाणे ब्राह्मणांना महाराष्ट्रात तितकं महत्त्व नाही, इकडे मराठा समाजाचे प्राबल्य अधिक आहे. पण मी जातपात मानत नाही



गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात बामणांना फार महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी मिश्रा, या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे, तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही.

कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे.

Nitin Gadkari Says, “Not Granting Reservation to Brahmin Community is God’s Greatest Blessing”