विशेष प्रतिनिधी
पुणे : भूमिका मांडून आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करा. अन्यथा शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिला आहे. Rohit Pawar
कर्जत जामखेड मतदारसंघात आमसभेत रोहित पवार यांनी एका अधिकाऱ्याला माज आलाय का अशी भाषा वापरत दमबाजी केली होती. यावरून अंजली दमानिया यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दमानिया यांना त्यावरून खडसावले होते.
आता रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दमानिया यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माननीय अंजलीताई, सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही पण तरीही खालील प्रमुख तीन विषय पुराव्यासह आपल्या निदर्शनास आणून देतो…
माननीय अंजलीताई,
सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात… https://t.co/zMuMqYrhIm pic.twitter.com/Nns4l0wMw4— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2025
आज राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी २० लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का? मेघा इंजिनिअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केलं म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ९५ कोटींचा दंड ठोठावून त्याचं साहित्य जप्त केलं, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ १७ लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का? सिडको ची ५००० कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे १२००० पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का?
या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत… अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, अंजली दमानिया या व्यक्तिरेखे बद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं.. चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही.
पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. मात्र आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या…
म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा..
Rohit Pawar’s advice to Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!