विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : Sanjay Gaikwad : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही तीन-तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो एका व्यक्तीकडून शंभर बोकडं दिली जातात. इतक्या खर्चाने निवडणुकीत कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो अशी खंत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
बुलडाणा येथे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, लहान कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला खर्च झेपणार नाही. त्यामुळे युती झाली पाहिजे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या नाहीत. एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी रुपये खर्च होतो आणि काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात. इतक्या खर्चाने निवडणुकीत कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो.
गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्याला जशी सवय, तशी वक्तव्ये. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे. संजय गायकवाड सत्य बोलतात आणि सत्य करतात. तीन कोटी रुपये आणि शंभर बोकडे… किती बोकडं पोसून ठेवली आहेत आणि किती कोटी जमा केले आहेत? किती कोटी देणार आणि किती बोकडे देणार, यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागेल.
दरम्यान, गायकवाड यांनी महायुतीला स्थानिक निवडणुका एकत्रितपणे लढण्याची विनंती केली. ते म्हणाले, आम्ही शिवसेना-भाजप महायुतीला प्राधान्य देणार आहोत, पण ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. आम्ही विधानसभा आणि लोकसभेला युती करतो, पण स्थानिक पातळीवर छोट्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यांनी पैसे खर्च करून मातीत जायचे आहे का?
Up to three crore rupees spent in local body elections, workers devastated: Sanjay Gaikwad’s regret
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!