विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar सध्या केंद्र सरकारने जवळपास सर्वच वस्तूंवरील जीएसटी दारांमध्ये बऱ्यापैकी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सगळ्या नागरिकांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र यावरूनही सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
केंद्र सरकारने आता रोजच्या वापरातील बहुतांश वस्तूंवरील जीएसटी काढून टाकला आहे. तर उर्वरित काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर हे ५% असणार आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र रोहित पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. Rohit Pawar
काय म्हणाले रोहित पवार?
सरकारच्या या निर्णयावर एका सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी टीका केली आहे. ‘आज वृत्तपत्रातल्या या जाहिराती व्यवस्थित बघा. गेली आठ वर्षे किराणा सामान, शार्पनर, वही, पेन यापासून देवाच्या अगरबत्तीपर्यंत, विमा हफ्त्यापासून, औषधे, कपडे-चपला तर शेतीच्या खतांपर्यंत भरमसाठ प्रमाणात जीएसटी आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात जवळपास ११० लाख कोटीहून अधिकचा गल्ला जमवला. त्यात एकट्या महाराष्ट्रातून २० ते २५ लाख कोटी रुपयांचा वाटा आहे. गेली आठ वर्षे जीएसटी च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापला आणि आजपासून खिसा कापणे काही प्रमाणात कमी करण्याच्या या निर्णयाला दिवाळी गिफ्ट, जीएसटी बचतीचा शुभारंभ म्हणणारं केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, असंच म्हणावं लागेल,’ असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. Rohit Pawar
तसेच, ‘आज देशात सरकारविरोधातल्या वाढत्या असंतोषामुळे केंद्र सरकारला आपल्याच कर्माची फळं भोगायची वेळ जवळ आल्याची चाहूल लागल्याने तसेच शेजारपाजारची परिस्थिती लक्षात आल्याने जीएसटी दरात सुधारणा करण्याची उपरती झाली,’ असे देखील ते म्हटले. ‘उशिरा का होईना, सरकारला जाग आली हे महत्वाचं आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन!,’ असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागतही केलं. तर, ‘जीएसटी सुधारणा हे क्रांतिकारी पाऊल असून वस्तूंच्या किमती कमी होणार, देशांतर्गत मागणी वाढणार असल्याची प्रतिक्रिया देत महागाई वाढल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली होती हे वास्तव अप्रत्यक्षपणे मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही विशेष अभिनंदन!’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील अभिनंदन केले आहे. Rohit Pawar
एकूणच या पोस्टमध्ये सरकारने घेतलेला हा निर्णय देशातल्या सरकारविरोधातील वाढत्या असंतोषामुळे घेतला आहे. तसेच हा निर्णय सरकारने बराच उशिरा घेतल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. Rohit Pawar
Rohit Pawar criticizes the central government over the GST decision!
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!