RRS Nagpur Head Office : संघाविषयी फेक नॅरेटीव्हद्वारे गैरसमज गृहभेटींद्वारे संवाद साधून दूर करणार

विशेष प्रतिनिधी

नागपूर : RRS Nagpur Head Office : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी फेक नॅरेटीव्हद्वारे अनेक गैरसमज पसरवले जातात. शताब्दी वर्षात गृहभेटींद्वारे संपर्कातून संवाद साधला जाणार आहे. यात संघाविषयी जनमानसात असलेले गैरसमज दूर करण्यात येईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आंबेकर म्हणाले, यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी दसरा उत्सव असल्याने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमात तब्बल 21 हजार स्वयंसेवक सहभागी होणार असून, शंकर महादेवन यांच्या गीताचा एक कार्यक्रमही होणार आहे. संघाचा हा शताब्दी दसरा उत्सव आहे. त्यामुळे तो इतर उत्सवापेक्षा तीन पट मोठा असेल. यावर्षी घाना, थायलंड, इंडाेनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आदी देशातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.



सुनील आंबेकर म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकासह संपूर्ण समाजाला आपल्या देशाविषयी गर्व आणि अभिमान वाटत आहे. देशाची प्रगती आणि संपन्नतेसाठी संघाने चालवलेले कार्य आणि उपक्रमात अनेक संस्था, संघटना आणि व्यक्ती स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. हीच संघ शताब्दीची मोठी उपलब्धी आहे.संघ शताब्दी वर्षात प्रत्येक गोष्ट किमान तीन पट मोठी आणि भव्य दिव्य राहणार आहे. एरव्ही दसरा उत्सवात साधारणत: 7 हजार स्वयंसेवक गणवेशात असतात. शताब्दी दसरा उत्सवात किमान 21 हजार स्वयंसेवक पूर्ण गणवेशात राहावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी संपर्क आणि संवादातून प्रयत्न केले जात आहेत.
परदेशी प्रतिनिधी येणार

यावर्षी शहरातून तीन पथसंचलने निघतील. त्याचे एकत्रीकरण व्हरायटी चौकात होणार असून सरसंघचालक मोहन भागवत त्याचे अवलोकन करणार आहे. तसेच यावर्षी घाना, थायलंड, इंडाेनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आदी देशातून प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. दसरा उत्सव नागपूर, मणिपूरसह संपूर्ण देशात साजरा होणार आहे. शहरातील वस्ती तसेच आठ ते दहा गावांचे एक मंडळ तयार करून दसरा उत्सव साजरा होणार आहे. याच प्रमाणे हिंदू संमेलनेही घेण्यात येईल.

Many misunderstandings about the RSS through fake narratives, communication will be done through contact through home visits