Agriculture Minister : कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन करणार पंचनामे; कृषि मंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : Agriculture Minister राज्यात सध्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पुरपरिस्थिति देखील निर्माण झाली आहे. यामध्ये सगळ्यात जास्ती नुकसान मात्र शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. याच मुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सगळीकडून होत आहे. सरकारने याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसला तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र जाहीर केली आहे.

राज्यात सर्वदूर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असतांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा फोटो पाठवणे आवश्यक होते. मात्र आता कृषिमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे, कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करतील. यामुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ कमी होईल. Agriculture Minister



या संदर्भात सविस्तरपणे बोलतांना भरणे म्हणाले की, ‘पंचनामे करण्याचे काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यासंबंधी तपासणी करत आहेत. जालन्यामध्ये तब्बल 2 लाख 54 हजार एजर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर नांदेड मध्ये सर्वाधिक हानी झाली आहे.’

त्याच बरोबर ‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील स्वतः या भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील’, असे देखील कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून पिके उध्वस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. Agriculture Minister

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलतांना स्पष्ट केले की, ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवली जाईल. त्यासाठी बंकांना तशा सूचना देखील देण्यात येतील. याशिवाय नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या हाती येण्यासाठी प्रक्रिया अत्यंत जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीच्या आधी कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळण्यात विलंब होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. Agriculture Minister

राज्यातील पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ही मदत निश्चित करण्यात आली असून पुढील आठ ते दहा दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. स्थानिक प्रशासनाला यासंबंधी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचे प्रमाण तपासत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस देखील अनेक भागांना भेट देणार असून शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवली जावी, यासाठी त्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन देखील सध्या युद्धपातळीवर काम करत असून, पंचनामे, विस्थापितांसाठी निवारा शिबिरे, अन्नधान्य व पाणी पुरवठा, तसेच जनावरांच्या हानीची नोंद करण्याचे कामही सुरू आहे. अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून शेतकऱ्यांपर्यत शासनाच्या मदतीचा लाभ पोहोचवत आहेत. Agriculture Minister

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय अजूनही बाकी आहे. मात्र सध्या परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने आणि काही भागात आणखी अतिवृष्टीचा अंदाज असल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील.कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन करणार पंचनामे; कृषि मंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पुरपरिस्थिति देखील निर्माण झाली आहे. यामध्ये सगळ्यात जास्ती नुकसान मात्र शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. याच मुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सगळीकडून होत आहे. सरकारने याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसला तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र जाहीर केली आहे.

राज्यात सर्वदूर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असतांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा फोटो पाठवणे आवश्यक होते. मात्र आता कृषिमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे, कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करतील. यामुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ कमी होईल.

या संदर्भात सविस्तरपणे बोलतांना भरणे म्हणाले की, ‘पंचनामे करण्याचे काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यासंबंधी तपासणी करत आहेत. जालन्यामध्ये तब्बल 2 लाख 54 हजार एजर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर नांदेड मध्ये सर्वाधिक हानी झाली आहे.’

त्याच बरोबर ‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील स्वतः या भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील’, असे देखील कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून पिके उध्वस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. Agriculture Minister

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलतांना स्पष्ट केले की, ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवली जाईल. त्यासाठी बंकांना तशा सूचना देखील देण्यात येतील. याशिवाय नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या हाती येण्यासाठी प्रक्रिया अत्यंत जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीच्या आधी कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळण्यात विलंब होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ही मदत निश्चित करण्यात आली असून पुढील आठ ते दहा दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. स्थानिक प्रशासनाला यासंबंधी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Agriculture Minister

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचे प्रमाण तपासत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस देखील अनेक भागांना भेट देणार असून शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवली जावी, यासाठी त्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन देखील सध्या युद्धपातळीवर काम करत असून, पंचनामे, विस्थापितांसाठी निवारा शिबिरे, अन्नधान्य व पाणी पुरवठा, तसेच जनावरांच्या हानीची नोंद करण्याचे कामही सुरू आहे. अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून शेतकऱ्यांपर्यत शासनाच्या मदतीचा लाभ पोहोचवत आहेत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय अजूनही बाकी आहे. मात्र सध्या परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने आणि काही भागात आणखी अतिवृष्टीचा अंदाज असल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील. Agriculture Minister

Agriculture and Revenue Department staff will go directly to the fields and conduct Panchnama; Agriculture Minister’s announcement

महत्वाच्या बातम्या