विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांचा समावेश आहे. आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू राहील आणि ती जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाईल. यामुळे प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासण्याची संधी मिळेल. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत हरकती व सूचना दाखल करणारे मतदार स्वतःचे नाव, पत्ता व मतदार कार्ड तपासून आवश्यक दुरुस्ती सुचवू शकतील.
महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
यानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. हरकती व सुचनांचे निराकरण केल्यानंतर येत्या दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांना मुदतवाढ मिळाली आहे. तेव्हाच आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका महापालिका निवडणुकीच्या आधी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या आरक्षण सोडतीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या आव्हान याचिकाही फेटाळण्यात आल्या होत्या. या सर्व आव्हान याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आता कोणत्याही क्षणी झेडपी निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती शक्यता आता प्रत्यक्षात आली आहे.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.
ZP and Panchayat Samiti Elections Announced, Voter List Program Released”
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!