Heavy rains : शेतकर्‍यांना दिलासा नाहीच; राज्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Heavy rains राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे- रस्ते वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. या पावसाचा तडाखा विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांना बसला आहे.

राज्यात हे सगळे सुरू असतांनाच आता हवामान विभागाने आणखी एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने २७ सप्टेंबरपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस अधिक तीव्र असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Heavy rains



हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या चिंतेत आता आणखीनच भर पडली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते पश्चिमेकडे सरकत आहे. या प्रभावामुळे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावस होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आता कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आधीच पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार असल्याचे दिसत आहे. Heavy rains

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीमध्ये पाणी साचले असून, कापूस, सोयाबीन, तूर, भात अशा हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई, ओला दुष्काळ जाहीर करणे आणि तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून राज्य सरकारकडे होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस होणार असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. Heavy rains

मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत पावसाची तीव्रता वाढु शकते. येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा धोका कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः दुपारनंतर मेघगर्जनासह वादळी पावसाची शक्यता असून २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढेल. तर, विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते. २७ व २८ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलं जात आहे.

यासोबतच, राज्यात ओला दुष्काळ जाहार करण्याची मागणीही चांगलाच जोर धरत आहे. कारण, ज्या भागात २० तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो आणि पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान होते तिथे अतिवृष्टी घोषित केली जाते. याबाबत ग्रामस्तरावर पीक आणेवारी समित्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. या अहवालांच्या आधारे जर गावाच्या जीवनमानावर विपरित परिणाम झाल्याचे आढळून आले, तर त्या भागात ओला दुष्काळ आल्याचे घोषित केले जाते. सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा लावून बसले आहेत. Heavy rains

No relief for farmers; Heavy rains likely again in the state between September 27 and 29

महत्वाच्या बातम्या