CM Fadnavis : मदत करताना हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : CM Fadnavis मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.CM Fadnavis

पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागालाही पुराचा मोठा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.CM Fadnavis



.https://twitter.com/CMOMaharashtra/status/1970764599558328476

पुरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार. आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल.

व्यावसायिक, फळबागा, नुकसानग्रस्त सरकारी कार्यालयांनाही मदत केली जाईल. तसेच पुराचा फटका बसलेल्या वस्त्या आणि शाळांनाही मदत केली जाईल आणि तातडीची मदत लवकरच दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Will Spare No Effort in Extending Aid, Assures CM to Flood-Hit Farmers

महत्वाच्या बातम्या