विशेष प्रतिनिधी
लातूर : Ajit Pawar मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बाेलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ चांगलीच घसरली. आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का? जाे काम करताे त्याचीच मारा! असे म्हणत त्यांनी एका शेतकऱ्यावर संताप व्यक्त केला. मात्र, त्यानंतर यालाच मुख्यमंत्री करा रे.. असे म्हणत त्यांनी वातावरण हलके करण्याचाही प्रयत्न केला.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. परांडा तालुक्यात पुराचा फटका बसलेल्या गावाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे एका शेतकऱ्यांने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर ते संतापले. Ajit Pawar
भूम परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द गावातील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना धीर दिला. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत’, असे म्हणत असतानाच एक शेतकरी म्हणाला, ‘दादा, कर्जमाफी करा ना.’
अजित पवार म्हणाले, जो काम करतो, त्याचीच मारा. आम्हाला कळतंय ना? आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय? भावा सकाळी सहा वाजता करमाळ्यापासून काम सुरू केलं. जाे काम करतं ना त्याचीच मारा. Ajit Pawar
यालाच मुख्यमंत्री करा रे असे म्हणत अजित पवार म्हणाले, एवढं जीव तोडून सांगतोय. अजून पण एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत करतोय. आज ४५ हजार कोटी रुपये वर्षाला मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, २० हजार कोटी रुपये भरतोय. इथे माझा कार्यकर्ता बसलाय. याने मला काल रात्री कॉल केला आणि म्हणाला की, दादा, इथे परांडा-भूममध्ये असं असं झालंय. पाणी आलंय. लोक घाबरून गेली आहेत. तिथून मी सूत्रं फिरवली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळी सोंग करतात येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. Ajit Pawar
Are We Here to Play Marbles?”: Ajit Pawar’s Slip of Tongue While Speaking to Farmers
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन