Nitin Gadkari दमानियांचे गडकरींवरील सर्व आरोप खोटे! ; भाजपाची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी 

मुंबई: Nitin Gadkari सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ मजली आहे. मात्र आता त्यांच्या या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे. Nitin Gadkari



काय आहेत गडकारींवरील आरोप?

दमानिया यांनी गडकरींवर टोलच्या माध्यमातून जनतेची लूट केल्याचा थेट आरोप केला आहे. लोक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे विविध कर भरत असताना अतिरिक्त टोल आकारण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर टोलमधून जमा झालेला पैसा ‘आयडीएल’ नावाच्या एका खासगी कंपनीकडे वळवून त्यानंतर गडकरीच्या मुलाच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा दमानिया यांनी केला. रस्ते जनतेसाठी बांधले जातात, पण त्याचा पैसा खासगी फायद्यासाठी वळवला जातो, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थेट गडकरींच्या राजकीय प्रमाणिकतेवर आणि कर्तव्यदक्षतेवर बोट ठेवले आहे. Nitin Gadkari

अंजली दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड ऑपरेट-्ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) या मॉडेलवरही जोरदार टीका केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलमधून प्रत्यक्षात रस्त्यांचे काम तर होत असते पण त्यामागे प्रत्येक किलोमीटरमागे भ्रष्टाचार लपलेला आहे. दमानिया म्हणाल्या की, ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटरमागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय आहे.

जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प जर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात असतील, तर हा स्पष्ट घोटाळा आहे, असे मतही त्यांनी मांडले. दमानिया यांनी थेट नितीन गडकरींच्या मुलांची नावे घेतली नसली तरी दोन्ही मुलांच्या कंपन्या असा उल्लेख करत टोलमधून मिळालेला पैसा आयडीएल कंपनीमार्फत थेट त्यांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. गडकरी मंत्री म्हणून देशसेवा करण्यासाठी आले होते, स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या उघडण्यासाठी नव्हे. मात्र, आपल्या पदाचा उपयोग करून त्यांनी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी राजकीय व प्रशासकीय शक्तीचा वापर केला, असा आरोप दमानिया यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनीही दमानिया यांच्या आरोपांची दखल घेत सरकारकडे स्पष्टीकरण मागण्याची तयारी दाखवली आहे. Nitin Gadkari

हे सगळे आरोप जुनेच!

मात्र आता भाजपाने हे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. गडकरींवर केल्या गेलेल्या आरोपांमध्ये कुठेही तथ्य नाही.  तसेच हे आरोप खोटे आणि जुने देखील असल्याचा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. खरंतर या प्रकारचे आरोप याआधी देखील गडकरींवर करण्यात आले होते. काँग्रेसने 2013 साली गडकरींवर हेच आरोप केले होते व त्यासंबंधी यंत्रणांनी चौकशी देखील केली होती. मात्र त्या चौकशीतही कोणत्याही प्रकारची तथ्य आढळले नव्हते. केवळ बदनामी करण्यासाठी गडकरींवर असे आरोप करण्यात येत आहेत असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे. खरं तर अशा प्रकारच्या आरोपांसाठी कोर्टात जाऊन यासंबंधी समोरच्या व्यक्तीला चॅलेंज केलं जाऊ शकतं, मात्र काही लोक तसं न करता केवळ बदनामीसाठी पदवीसाठी बेछूट आरोप करतात, असे म्हणत त्यांनी अंजली दमानियांवर खोटे आरोप केल्याचा आरोप देखील लावला आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे आता खरंच केवळ गडकरींची राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठीच त्यांच्यावर या प्रकारचे आरोप सतत केले जात आहेत का? असा प्रश्न पडतो. जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर आरोप करणारी मंडळी यासंबंधी कोर्टामध्ये धाव का घेत नाही? हा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतो. Nitin Gadkari

All of Damania’s allegations against Nitin Gadkari are false!; BJP’s reaction

महत्वाच्या बातम्या