Marathwada सत्ताधाऱ्यांसोबतच आता विरोधकही मराठवाड्यात दाखल; सध्या काय आहे परिस्थिती?

विशेष प्रतिनिधी 

सोलापूर : Marathwada गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले आहे आणि पुरपरिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी या पुराने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

अशा परिस्थितित सगळीकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची, सरसकट कर्जमाफी करण्याची, तर अन्य काही प्रकारे देखील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सरकारकडे होऊ लागली. सरकारने देखील २२५१ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.



दरम्यान पुरजन्य भागात पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्यातील अनेक भागात भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्यांविषयी जाणून घेतले. मात्र आता सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकही पूरग्रस्त भागात पहाणी करण्यास गेले आहेत. तर काही मंत्र्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे. Marathwada

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी काटगाव परिसरातील नुकसानीची पहाणी करून तेथील शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान ठाकरेंनी आम्ही तुमच्यासोबतच आहोत. सरकारची मदत काधिपर्यंत पोहोचते ते आपण पाहू. मात्र यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. Marathwada

राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही नुकसानीची पहाणी

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेणापुर तालुक्यातील मोटेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. तसेच या पहाणीदरम्यान त्यांनी शेतकाऱ्यांशी देखील संवाद साधला आणि त्यांच्या कडून नुकसानीबाबत माहिती घेतली. Marathwada

आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागण्यांची दाखल घेऊन त्वरित उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील अशी आशा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

अजित पवार सकाळपासूनच दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पहाणीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता पिंपळगाव घाट येथून त्यांनी पाहानीला सुरुवात केली. त्यानंतर हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी यांसारख्या गावांना देखील भेट देत त्यांनी पिकांचे, शेतांचे, आणि बाधित भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. Marathwada

याव्यतिरिक्त छगन भुजबळ यांनी देखील येवला-निफाड तालुक्यांचा दौरा केला आहे. तर आमदार विश्वजीत कदम यांनी देखील सांगली जिल्हा कॉँग्रेस कमिटी आणि भारती विद्यापीठाकडून पूरग्रस्तांसाठी मदत केली जाणार असल्याची माहिती दिली.

धाराशिवमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या!

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. अनेक मंत्री आपापल्या परीने त्यांना शक्य तितकी मदत करत आहे, पूरग्रस्त भागांची पहाणी करत आहेत. मात्र तरीदेखील शेतजमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने धारशिव जिल्ह्यातील म्हात्रेवाडी येथील एक ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे सोयाबीन व कांद्याचे पिकाचे नुकसान तसेच जमीन खरडून गेल्याने ते मानसिक तणावाखाली होते. दरम्यान, छत्रपती सांभाजीराजे भोसले यांनी संबंधित कुटुंबाला भेट देऊन १ लाख रुपयांची मदत केली आहे. मात्र गावकऱ्यांनी राज्य सरकारकडून ठोस मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. Marathwada

Along with the ruling party, the opposition has now also entered Marathwada; What is the current situation?

महत्वाच्या बातम्या