विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानीची बातमी अत्यंत दुःखद आहे, अशी भावना काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. Rahul Gandhi
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी हाेत आहे. शेतकऱ्यांची घरे दारे वाहून गेली. पिकांचे तर नुकसान झाले आहेच; पण जमीनही खरवडून गेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले, या कठीण काळात माझ्या संवेदना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत. सरकार आणि प्रशासनाने मदत कार्यात गती आणावी आणि पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि गरजू लोकांना शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. Rahul Gandhi
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काटगाव परिसरातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने जाहीर केलेली मदत पुरेश आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारला असता, ही मदत तुटपुंजी असल्याचे शेतकरी म्हणाले. तसेच हेक्टरी 50 रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवली. तसेच सणाच्या आधी मदत मिळावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारची मदत कधीपर्यंत येते ते आपण पाहू. पण कोणीही चुकीचे पाऊल उचलू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. Rahul Gandhi
The loss in Marathwada is tragic; Rahul Gandhi demands immediate help from the government
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन