MPSC exam पूर स्थितीमुळे ‘एमपीएससी’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष !

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : MPSC exam गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. याचा सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि मराठवाडा सारख्या काही भागांना चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र रविवारी (ता. 28) 36 जिल्हा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यात झालेला अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तर काही भागातील लोकांना स्थलांतर देखील करावे लागले आहे. अशा परिस्थितीत या भागातील विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे. MPSC exam



महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दीडशेहून अधिक गावे प्रभावी झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची सोय देखील यामुळे उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे देखील कठीण आहे. लोकसेवा आयोग मात्र परीक्षा 28 तारखेला घेण्याच्या निर्णयावरच ठाम आहेत. त्यामुळे या संदर्भात आता सोलापूर अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. MPSC exam

पुरामुळे ग्रंथालय बंद आहेत, अभ्यास साहित्याचे देखील बऱ्यापैकी नुकसान झाले आहे आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आपण तात्काळ पावले उचलण्याची आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच, घरी अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके आणि अभ्यास साहित्य हरवले आहे. शहरात राहणाऱ्या देखील काही विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही त्यांच्या गावीच आहेत. परंतु पुरामुळे रस्ते तुटले आहेत आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अशात परीक्षा केंद्रावर पोहोचणे अशक्य आहे, असे देखील विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमधील आपत्कालीन परिस्थिती बघता राज्यात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या तांत्रिक आणि बिगर तांत्रिक पदांसाठीच्या भरती परीक्षा, या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलल्या जाणार का? आणि मुख्यमंत्री नेमका आता याच्यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. MPSC exam

Demand to postpone MPSC exam due to flood situation; Attention to the Chief Minister’s role!

महत्वाच्या बातम्या