Dharashiv : जिल्हा पाण्यात आणि जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, व्हायरल व्हिडिओमुळे धाराशिवमध्ये संताप

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : Dharashiv धाराशिव जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविलेला, लोक पाण्यात अडकलेले, खासदारांपासून अनेक लोकप्रतिनिधी मदतकार्यात गुंतलेले होते. मात्र जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारीकीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यात दंग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.



तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थानकडून यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये त्यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होती. त्याच दिवशी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या पावसामुळे सर्वत्र पुराचा हाहाकार मजला. पाऊस आणि पुरानंतर मंत्री हे धाराशिव दौऱ्यावर आले होते, पाहणी करत होते, त्यानंतर हे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आढळून आले. मात्र, त्याच संध्याकाळी जो कार्यक्रम होता सांस्कृतिक महोत्सवाचा त्यामध्ये जिल्हाधिकारी कीर्ती पुजार त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उपस्थित राहिले. फक्त उपस्थिती लावली नाही तर त्या कार्यक्रमात त्यांनी गाण्यांवर ठेका धरला. Dharashiv

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे अशी टीका होत आहे, जिल्ह्यात विदारकदृश्य असताना हे सर्व नाच गाण्याचे कार्यक्रम होत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उडते आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. Dharashiv

The district was flooded and the District Collector danced and sang, anger in Dharashiv due to the viral video

महत्वाच्या बातम्या