विशेष प्रतिनिधी
जालना : एसटीचे आरक्षण केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मान्यतेने देते आणि त्यासाठी राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो. मागच्या सरकारने धनगर समाज एसटीत बसत नाही, असा अहवाल पाठवला होता. हाच एक मोठा अडथळा ठरत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील दीपक बोऱ्हाडे हे गेल्या 10 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दीपक बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले , मराठा आणि एसटीच्या आरक्षणासाठी कायदा करता येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेली ही एक यंत्रणा आहे. पाच संस्था एकत्र येऊन केंद्र सरकारला एक अहवाल सादर करतात. त्यानंतर केंद्र सरकारचा जनजाती आयोग त्यावर एक रिपोर्ट तयार करतो. याच रिपोर्टच्या आधारावर केंद्र सरकार नंतर आरक्षणाचे वर्गीकरण करते, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे असं सरकारचं शिष्टमंडळ दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी पोहचलं होतं. शिष्टमंडळाने दीपक बोऱ्हाडे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती केली. मात्र दीपक बोऱ्हाडे यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरही आपल्या उपोषणावर ठाम होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून त्यांची आणि दीपक बोऱ्हाडे यांच्यामध्ये संवाद घडवून आणला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील दीपक बोऱ्हाडे यांना आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती केली, तसेच चर्चेला येण्याचं आवाहन केलं. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी एसटीतून आरक्षण देण्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाही दीपक बोऱ्हाडे यांना समजावून सांगितले.
दीपक बोऱ्हाडे यांच्याशी फोनवर संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणीही काहीही बोलू द्या. तसेच मी तुम्हाला काहीही लिहून दिलं, तरी जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये चर्चा होत नाही, तोपर्यंत मार्ग निघणार नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे की, लोकांनी न्यायालयात केसेस केल्या आहेत. तसेच आपण देखील आरक्षणाबाबत न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयामुळे आरक्षणाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी दीपक बोऱ्हाडे यांना चर्चेला येण्याची विनंती करतानाच म्हटले की, आरक्षण अजूनही आपल्याला हातून गेलेलं नाही. तुम्ही चांगल्या वकिलाकडून प्रक्रिया समजून घ्या. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. तसेच एसटीचे संवैधानिक आरक्षण आहे. त्यामुळे त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही आमच्याशी चर्चा करा, आपण यावर मार्ग काढू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दीपक बोऱ्हाडे यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले.
Mahavikas Aghadi obstructed the provision of ST reservation to the Dhangar community, Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक