विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसण्याची गरज असताना, ते मुंबईत काय करत आहेत? गरबा तर पुढच्या वर्षी खेळता येईल. हा सामाजिक आणि राजकीय गुन्हा आहे. अमानुष प्रकार आहे. या मंत्र्यांना बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मराठवाड्यात मुक्कामाला थांबणे गरजेचे होते. हे अत्यंत कामचूकार सरकार आहे. आमच्या शिवसेनेचे लोक मदत करत आहेत त्यांना मात्र मर्यादा आहेत. जमीन फाटून गेली आहे. अशा वेळेला पुर्ण मदत ही सरकारनेच केली पाहिजे. मात्र सरकार क्रिकेट मॅचच्या नियोजनाला लागले आहे. आयपीलचं नियोजन करत आहे.
पालकमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांत ठान मांडून बसले पाहिजे, इकडे गरबा खेळत बसण्यापेक्षा तिकडे मदत करायला गेले पाहिजे. गरबा पुढच्या वर्षी देखील खेळायला येतो, तुमच काय काम आहे गरब्यात? असा सवाल राऊत यांनी केला.
मराठवाडा, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातही पाऊस सुरु आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहेत? गमबूट घालून चार तास एक दौरा केलात आणि परत आलात. तुमचे त्या त्या भागाचे पालकमंत्री कुठे आहेत? धाराशिवचे पालकमंत्री एकदा दोन टेम्पो घेऊन गेले, फोटो लावून गेले. आभाळ फाटलंय, जमीन वाहून गेली आहे. अशावेळी पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला हवी. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं आहे. आयपीएलच्या तयारीला लागले आहे.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यातून टीका करताना राऊत म्हणाले जय शहा आणि त्याच्या वडिलांचा गौरव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला पाहिजे. तसेच, पाकिस्तानात निशाण ए पाकिस्तान सर्वोच पुरस्कार आहे तो शहा पितापुत्रांना दिला पाहिजे.
Sanjay Raut demands dismissal of Dharashiv’s guardian minister who played Garba in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…