Tanaji Sawant : सावंत कुटुंबातील भाऊबंदकी, बंगला बुडूनही चाैकशी केली नसल्याने तानाजी सावंतांवर बंधुंचा हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

माढा : Tanaji Sawant माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील भाऊबंदकी उफाळून आली आहे. अतिवृष्टीतच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संपर्क संपर्क केला नसून, ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार आहे, असा आरोप प्रा. शिवाजी सावंत यांनी केला.



शिवाजी सावंत म्हणाले, सीना कोळेगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा साठवून ठेवण्यात आला. याची दक्षता घेण्यात आली नाही. धरण क्षेत्रात परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व धरणात असलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने महापूर आला. घरातल्या तेल, डाळी, तिखट, मिठासह प्रपंच वाहून गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ ५० किलो धान्य व २५ हजार रुपयांची रोख मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. Tanaji Sawant

सावंत यांच्या जयवंत बंगल्याचा एक मजला पूर्णपणे पाण्याने भरला होता. घरातील सामान देखील वाहून गेले. तहसीलदार यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. साफसफाईसाठी आलेले ५० ते ६० कामगार अडकले होते. यावेळी सरपंच ऋतुराज सावंत यांनी छाती इतक्या पाण्यात स्वतः कामगारांना बाहेर काढल्याने कामगारांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कामगार घराकडे जाताना अचानक पाणी वाढल्याने भयभीत झाले होते. मात्र, सहकाऱ्यांसोबत त्यांना दिलासा देत बाहेर काढल्याने या कामगारांना घराकडे जाण्यासाठी मदत झाली.इतका महापुराचा वेडा घातला होता, शासकीय मदत देखील पोहोचवण्यासाठी चार दिवस लागले. यंत्रणेला वारंवार संपर्क केला, मात्र पूर आल्यानंतर चौथ्या दिवशी शासकीय यंत्रणेची मदत मिळाली. मात्र, या अगोदर पृथ्वीराज सावंत व सरपंच ऋतुराज सावंत यांच्यासह नातेवाईक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली, असे त्यांनी सांगितले. Tanaji Sawant

Brothers attack Tanaji Sawant for not investigating the Sawant family’s bungalow after it was submerged

महत्वाच्या बातम्या