Laxman Hake attacks Sharad Pawar : ओबीसीचेअंतःकरण जर समजून घेतले असते तर पंतप्रधान झाला असता, लक्ष्मण हाके यांचा शरद पवारांवर हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

पुणे : Laxman Hake attacks Sharad Pawar :  चार कुटुंबाच्या पलीकडे पक्ष जाऊ दिला नाही. दीड जिल्ह्याच्या पुढे तुमची व्याप्ती नाही. ओबीसीचे 18 पगड जातींचे महाराष्ट्रातील 50 ते 60 टक्के लोकांचे अंतःकरण जर समजून घेतले असते तर शरद पवार हे देशाचे पंतप्रधान झाले असते, पण तुमचे दुर्दैव आहे की तुम्हाला पैसा, कारखाने, उद्योग-धंदे, पैसा, बांधकाम व्यवसाय, यात रस आहे, तुम्हाला सामान्य माणसाच्या हिताची भाषा करायची नाही,असा हल्लाबाेल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर केला.

पत्रकारांशी बाेलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे यांचे आंदोलन शरद पवार यांनी मोठे केले. ते मुरब्बी राजकारणी आहेत. एका बाजूला ते मंडल आयोग आम्ही लागू केले म्हणतात दुसरीकडे मनोज जरांगे यांचे भूत उभे करायचे ओबीसी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मानगुटीवर बसवायचे जी आर पारित करायला लावायचा आणि प्रमाणपत्र वाटप सुरू झाले की म्हणायचे महाराष्ट्राची वीण उसवली जात आहे, असे म्हणत ओबीसी आरक्षणाचे राजकारण करत असल्याने आम्ही शरद पवारांना टार्गेट करतो.



हाके म्हणाले की, अजित पवार, आणि सुप्रिया सुळे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे म्हणत आपण आरक्षणाकडे काय भावनेने बघतो ही विकृती त्यांनी दाखवून दिली आहे. पवार कुटुंब सामाजिक न्यायाच्या बाजूने कधी नव्हतेच. असे असते तर त्यांनी असे काही वक्तव्य केले नसते.शरद पवार गटाने महाराष्ट्र आणि ओबीसींचे फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यांनी महाराष्ट्र ओरबाडला आणि आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊ दिला नाही, त्यांनी मंडल आयोगाचे, समतेचे आणि लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचे तत्व काय कळणार,असे म्हणत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी म्हणत शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, मी ओबीसी समाजाचा आंदोलक आहे. मी कुठे आमदार-खासदार किंवा कारखानदार आहे. माझ्या घरात कुणीच राजकारणात नाही, ही माझी सुरुवात आहे, माझेही काम दिसेल. मी आता प्रश्न उपस्थित करत आहे, माझे काय योगदान आहे ते सुद्धा कळेल. माझे आका देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आहेत सर्वच पक्षात माझे आका आहेत जे जे ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडत आहे ते सर्व जण माझे आका आहेत. वैचारिक अर्थाने जितेंद्र आव्हाड देखील माझे आका आहेत.

शरद पवार यांनीच केवळ महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला हे जे कुणी सांगत आहेत ते महाराष्ट्राची आणि ओबीसींची दिशाभूल करत आहेत. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यातून मंडल आयोग सुटून 9 न्यायाधीशाच्या बेंच पुढे केस जिंकून सगळ्या देशात लागू झाला ना तेव्हा महाराष्ट्रात लागू झाला पवार साहेबांनी लागू केला. महाराष्ट्र काय अपवादात्मक राज्य होते का? देशभरातील प्रत्येक राज्यात काही दिवसांच्या फरकाने लागू झाला. महाराष्ट्रा पूर्वी बिहारमध्ये मंडल आयोग लागू झाला आहे. प्रशांत जगताप यांनी आम्हाला उगच खोलात जायला लावू नये असे म्हटले आहे. तर मला देवाने थोडे उशिरा 1980 मध्ये धाडले. मला जर पवारांच्या काळात धाडले असते तर मी पण काही तरी केले असते. पण ते काही आपल्या हातात नसते, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

If he had understood the hearts of OBCs, he would have become the Prime Minister, Laxman Hake attacks Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या