विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.
अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुस्लिम समाजाने पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ आली. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, मी एका कार्यक्रमात व प्रवासात असल्यामुळे या घटनेची संपूर्ण माहिती अजून माझ्याकडे आली नाही. सध्या माझ्याकडे केवळ प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर भाष्य करेन. पण अलीकडच्या काळात काहीतरी प्रयत्न होत आहे की, महाराष्ट्रात काही बोर्ड लावायचे किंवा काहीतरी करायचे. येथील सामाजिक आरोग्य बिघडवण्यामागे नेमके कोण आहे? हे आपल्याला शोधावे लागेल. ते नक्की आम्ही शोधू व त्यावर कारवाईही करू.
मुंबई, वसई भागातही अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आलेत. सोशल मीडियातही अशा नावांचा वापर केला जात आहे, अशी बाब यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मला तेच म्हणायचे आहे की, हे जाणीवपूर्वक होत आहे का? ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीपूर्वी काही प्रयत्न करण्यात आले. एक प्रकारे लोकांना संगठित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसाच प्रयत्न होत आहे का? याकडेही लक्ष द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
Strict action will be taken against those who are destroying the social health of the state, Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…