विशेष प्रतिनिधी
मुंबई : cancer treatment राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक कर्करोग उपचार मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा राज्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (MAHACARE Foundation) ही स्वतंत्र कंपनी स्थापन होणार आहे.या फाऊंडेशनच्या भागभांडवलासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना एकसमान दर्जाचे उपचार मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक स्तरावर कर्करोग उपचार उपलब्ध करून दिले जातील. राज्यभरातील प्रमुख १८ रुग्णालयांमधून विशेष कर्करोग उपचार आणि तपासणी केंद्रे सुरू केली जाणार.‘महाकेअर फाऊंडेशनद्वारे संशोधन, प्रशिक्षण, जागृती आणि रुग्णांना परवडणारी सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार. cancer treatment
याशिवाय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आरोग्य, उद्योग, ऊर्जा, नियोजन व न्याय क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले. कर्करोग उपचाराचे सर्वसमावेशक धोरण, जागतिक क्षमता केंद्र (GCC) धोरण, अतिरिक्त वीज विक्री कर, भू-स्थानिक तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र महामंडळ आणि फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची स्थापना या महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
उद्योग क्षेत्रासाठी GCC धोरण २०२५ : महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्र (Global Capability Center) म्हणून विकसित करण्याचे धोरण जाहीर. यामुळेगुंतवणूक वाढवणे, बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सहकार्य, कौशल्य विकास व तंत्रज्ञान हस्तांतरण यांना प्रोत्साहन मिळणार.हे धोरण “विकसित भारत २०४७” च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वीज ग्राहकांवर अतिरिक्त वीज विक्री कर : औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारला जाणार. या करातून मिळालेला निधी प्रधानमंत्री कुसुम योजना घटक-ब तसेच सौर कृषीपंप योजनेसाठी वापरला जाणार. यामुळे शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित पंपाचा पुरवठा सुलभ होईल.
महाजिओटेक महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. राज्यात भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा (Geospatial Technology) वापर करून महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे जमीन सर्वेक्षण, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, शेती नियोजन, वाहतूक व्यवस्था यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता वाढणार आहे. cancer treatment
फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापण्याचा निर्णय विधि व न्याय विभागाअंतर्गत घेण्यात आला. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. न्यायालयीन पायाभूत सुविधा, आवश्यक न्यायाधीश व कर्मचारी पदांसाठी लागणारा खर्च शासन उचलणार आहे. cancer treatment
Comprehensive policy for cancer treatment, three-tier service from 18 hospitals
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!