विशेष प्रतिनिधी
सातारा : Koyna Dam सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत. अशातच आता पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. मंगळवारी (ता.३०) मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून चार किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचा धक्का हा बऱ्यापैकी सौम्य असल्याने तो केवळ कोयनानगर परिसरातच जाणवला, इतर कोणत्याही भागांत नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये थोडेशे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोयना धरण व्यवस्थापनाने तात्काळ तपासणी करून धरण सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. Konya Dam
भूकंपाचा कंद्रबिंदू हा सातान्याच्या पाटण तालुक्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्य दिशेला तीन किलोमीटर अंतरावर होता. कोयनानगरमध्ये लोकांना हलकेच कंप जाणवले आणि काही ठिकाणी भांडी, खिडक्या थरथरत असल्याचे दिसून आले. मात्र तरीही कोणत्याही घरांची पडझड किंवा जीवितहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ याबाबतची माहिती दिली असून, पाटण तालुक्यात कुठेही मोठे नुकसान झाले नसल्याचे स्प्ट केले आहे. स्थानिक नागरिकांनी मात्र भूकपाचा हा अनुभव पुन्हा जानवल्याने थोडीशी धास्ती व्यक्त केली आहे दरम्यान, या भागात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
याआधी, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी देखील कोयना धरण परिसराला भूकंपाचा एक सौम्य धक्का बसला होता. दुपारी २.४५ च्या सुमारास झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर इतकी नोंदवली गेली होती. त्या भूकंपाचा कंद्रबिंदू हा धरणापासून जवळपास ४१ किलोमीटर अंतरावर होता. तो वारणा खोऱ्यातील तानमळा गावाच्या पूर्वेला १० किलोमीटर आणि चिपळूणच्या दाक्षिणेला ११ किलोमीटर अंतरावर होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यावेळीही धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. गेल्या काही वर्षात कोयना धरण परिसरात असे अनेक छोटे-मोठे धक्के सतत जाणवत असल्याने हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. Konya Dam
सतत होणाऱ्या भूकंपांचे काय परिणाम ?
या परिसरात २०२५ पासून नोंदविला गेलेला हा तिसरा भूकंप आहे. या परिसरातील वर्षातील पहिला भूकंप हा ५ जानेवारी रोजी २.४ रिश्टर इतक्या तीव्रतेने झाला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी दुसरा, आणि आता ३० सप्टेंबर रोजी तिसरा धक्का बसल्याची नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाचा परिणाम काय होतो, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोयना धरण परिसरात विशेष यंत्रणा बसवण्यात येत आहे.
धरणावर अत्याधुनिक उपकरणे बसवून भूगर्भातील हालचा्लींची बारकाईने नोंद घेण्याची तयारी आता प्रशासनाने सुरू केली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या भागातील दगडांची रचना, धरणातील पाण्याचा दबाव आणि जमिनीतील हालचालींमुळे सतत असे सौम्य धक्के बसत असतात. या सौम्य धक्क्यांचा परिणामही फार हलका आणि थोडाच असतो. याचा कोणताही तीव्र परिणाम जाणवत नसल्याचंही त्यांच मत आहे. Konya Dam