विशेष प्रतिनिधी
पुणे : Owaisi सध्या राज्यात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक स्थानिक व राजकीय पक्ष यासाठी आपला कसून जोर लावतांना दिसत आहेत. अनेक दिग्गज नेते देखील यामध्ये वैयक्तिक लक्ष घालतांना दिसत आहेत. ज्यात एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, राज ठाकरे यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो. यात आता असाउद्दीन ओवेसी यांच देखील नाव जोडलं गेलं आहे.
‘एमआयएम’चे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांची रणनीती देखील तयार असल्याचं दिसतंय. निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी राज्यातील पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
निवडणुकांसाठी राज्यातील मुस्लिम युवकांना आपल्याकडे ओढण्याचा ओवेसी यांचा प्रयत्न असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. ओवेसी यांच्या कोल्हापूरमधील इचलकरंजी येथील सभेला मुस्लिम युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील दिला. यावेळी ओवेसींनी मुस्लिम युवकांनी राज्याचे प्रतिनिधित्व करायला हवे असे मत व्यक्त केले. तसेच मला निवडून दिल्यानंतर तुम्हाला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील राहील असे आश्वासनही ओवेसींनी यावेळी दिले. Owaisi
काय आहे ओवेसींची रणनीती?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसी जास्तीत जास्त दौरे करणार आहेत. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. तसेच ओवेसी यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी देखील सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे स्थानिक पक्ष आणि ‘एमआयएम’ यांचा या निवडणुकीत मेळ होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. Owaisi
पक्ष विस्तार करण्यासाठी ओवेसी जास्तीत जास्त मुस्लिम तरुणांना आकर्षित करणार आहेत. यासाठी ते कोल्हापूर, मिरज, मालेगाव, सांभाजीनगर, अहिल्यानगर अशा मुस्लिम बहुल भागात जास्तीत जात दौरे आणि सभा घेणार आहेत.
जिथे पक्षाची ताकद अधिक असेल, अर्थात मुस्लिम बहुल भागात निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले आहे. तसेच प्रस्थापित पक्षांनी तुमची निराश केली आहे. त्यामुळे यावेळी मला मतदान करा आणि नंतर जाब देखील विचारा असे आवाहन त्यांनी मुस्लिम समाजाला केले आहे. सोबतच, केवळ ‘आय लव्ह मोहम्मद’ म्हणून चालणार नाही तर त्यांच्या विचाराचे आचरण देखील करा असं सल्लाही ओवेसींनी दिला आहे. Owaisi
या निवडणुकीदारम्यान ओवेसी यांनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करणार असल्याची उघड उघड भूमिका घेतली आहे. त्यानुसारच त्यांची मोर्चेबांधणी देखील चालू आहे. यामुळे त्यांना मुस्लिम मतदार वर्गाचा जरी पाठिंबा मिळणार असेल तरी यामुळे कदाचित इतर मतदार वर्ग ओवेसींकडे पाठ फिरवू शकतात. त्यामुळेच या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. Owaisi
Owaisi ready for local self-government elections; what will be the strategy?
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!