Maharashtra : ब्रेकनंतर पाऊस पुन्हा महाराष्ट्रात धडकणार! कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Maharashtra गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांसोबत जनावरं आणि शेतजमिनी देखील वाहून गेले आहेत. मात्र, आता दोन दिवसांपासून पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. ही विश्रांती मात्र काहीच दिवसांची असल्याचा अंदाज आता हवामान खात्याने व्यक्त केला आहे.



हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी हवामान खात्याने काही विशिष्ट जिल्ह्यांना पुन्हा एकदा अलर्ट देखील जारी केला आहे. हवामान विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. ३० सप्टेंबरपासून ते ३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भ, मराठवाडा व तळकोकणातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. Maharashtra

मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. यामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मात्र बहुतांश भागातील पाऊस ओसरला होता. मात्र आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पुढील चार दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे तर १ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सातारा घाटमाथा, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. दोन ऑक्टोबर हिंगोली परभणी नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आणि येलो अलर्ट देखील जाहीर केला आहे. Maharashtra

३ ऑक्टोबर रोजी मात्र संपूर्ण विदर्भातच पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून बीड, परभणी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार असल्यामुळे शेतीचे पूर्णपणेच नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता शेतकारीनाची चिंता आणखीनच वाढली आहे.

दरम्यान यामुळे आता सरकारला देखील कर्जमाफीबाबत आणि नुकसान भरपाई संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. हवामान खात्याने पुन्हा जाहीर केलेल्या अलर्ट मुळे आता जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अलर्ट नुसार नदीकाठावरील व धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा केला आहे. Maharashtra

After the break, rain will hit Maharashtra again! Which districts have alerts?

महत्वाच्या बातम्या