Abu Azmi : अबू आझमी यांनी पुन्हा ओकली मराठी विरुद्ध गरळ, ‘मनसे’च्या उत्तराचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Abu Azmi हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज? असा सवाल करत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पुन्हा एकदा गरळ ओकल्याने मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे. अबू आझमी यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला. आझमी यांना मराठीची लाज वाटत असल्यास आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देणार, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.



अबू आझमी (Abu Azmi) हे भिवंडीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी त्यांना मराठीत प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. मात्र, मराठी आणि हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीही बोलू शकतो, पण मला त्याची गरज काय आहे? हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली. दिल्लीत गेलात तर मराठी कुणाला कळणार नाही. मी युपीत जाऊन मराठी बोललो, तर माझे बोलणे कुणी ऐकणार नाही, असेही अबू आझमी म्हणाले.

http://youtube.com/post/Ugkx0bPRMWCrPNYOgVebitzQywlcCMsVn7gj?si=ktmOLIXhFprT1Dk2

अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विधानावर संताप व्यक्त करताना मनसेने म्हटले आहे की, अबु आझमी तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करता. इथे राजकारण करताना, तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैय्याची पर्वा पडली आहे का? असा सवाल मनसेने केला. भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि इथे मराठीच चालणार. तुम्हाला इथे मराठी बोलायला लाज वाटत असेल, तर तुम्हाला मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिला आहे.

Abu Azmi Once Again Spews Venom Against Marathi, MNS Warns of Retaliation

महत्वाच्या बातम्या