Raju Shetty : ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर जिझिया कर कशासाठी? राजू शेट्टी यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

काेल्हापूर : Raju Shetty  अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये या प्रमाणे १५ प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाेरदार हल्लाबाेल केला आहे. ऊस उत्पाद क शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे, एकरी दहा ते बारा टनाची घट झाली आहे. तरीही हा जिझिया कर कशासाठी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. Raju Shetty

पूर बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये या प्रमाणे १५ प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारला जर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची जमत नसेल तर दुसऱ्या शेतकऱ्यांकडून घेऊन त्यांना द्यायचे हे काही बरोबर नाही, या गोष्टीला दलाली हा एकच शब्द आहे, अशी जाेरदार टीका शेट्टी यांनी केली आहे.



 

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध पातळीवर मदतकार्य सुरु केले आहे. ऊस गाळप हंगामात मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी आजवर शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती. मात्र यंदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यात तीनपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, सरकारला अशाप्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. सरकार सातत्याने ऊस उत्पादकांच्या विरोधात आहे, साखर कारखानदारांच्या बाजूने निर्णय घेत आहे. कोर्टाने एफआरपीबाबात आदेश दिला असताना राज्य सरकार या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागत आहे. या आदेशाला स्थिगिती देण्याची मागणी करत आहे. यावरुन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असे दिसतेय. आता सरकारला कपात वाढवण्याचा नैतिक अधिकार आहे का?,

साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांंनाही फटका बसला आहे. अशावेळी कपातीमध्ये तीनपट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ही कपात शेतकऱ्यांसाठी ही मदत असल्याचे सांगत संघाचा विरोध झुगारुन लावण्यात आला, असे शेट्टी यांनी सांगितले.

Why impose jizya tax on sugarcane farmers? Raju Shetty questions

महत्वाच्या बातम्या