विशेष प्रतिनिधी
नागपूर : माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पध्दतीने वस्तुस्थितीला धरुन नसलेली टीका झाली व अजुनही होत आहे. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतले आहे. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथीत व दुःखी झाली आहे, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येत्या 5 ऑक्टोबरला अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर उद्भवलेल्या वादावर खुद्द कमलताईंनी अखेर प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, आपले वय 84 वर्षे असून प्रकृती बरी नसल्याने आणि सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याने त्या 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
कमलाताई त्यांच्या पत्रात म्हणाल्या, दिनांक 05 ऑक्टोबर, 2025 च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पत्र समाजमाध्यमावर व वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाले आहे. ते पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाज बांधवाने लिहिले असावे. त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. दिनांक 05 ऑक्टोबर, 2025 ला होणाऱ्या एका कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीतले काही लोक आले होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना व मंगलकामना असतात. त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा मैत्रीभाव व बंधूभाव हा सर्वांप्रती आहे.
परंतु या कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर सुध्दा टीकाच नव्हे तर दोषारोपण केले. आम्ही पण आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचे असते. यासाठीही धाडस लागतं./सिंहाचं काळीज लागतं. दादासाहेब जाणून बुजून अशा विरोधी मंचावरती जायचे तेथे वंचितांचे प्रशन मांडायचे हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ते आपली भूमिका ऐकवावी असे त्यांचे मत होते. ते संघाच्या कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्विकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक विचारांची मांडणी केली.
मी त्या विचार मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब याच विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचारच मांडले. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा आपल्या संस्काराचा भाग आहे.
माझे वय 84 असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने सद्या उपचार घेत आहे. कुठेतरी थांबले पाहीजे या कारणाने 05 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात जाणार नाही एवढे खरे !…आता विसाव्याचे क्षण! भरुन येते मन, भरुन येते मन.
Kamaltai Gavai regrets attempts to tarnish her life dedicated to the Ambedkar movement
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!