विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jain community दादर कबुतरखाना वादाला आता राजकीय वळण मिळाले आहे. आमच्या मुद्द्यांसाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही असा आरोप करत शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.Jain community
मधल्या काळात मुंबईत कबूतरखान्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर दादर स्टेशनजवळील कबूतर खाना बंद करण्यात आला होता. ज्यावेळी हा कबूतर खाना बंद करण्यात आला, त्यावेळी जैन समाजाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. जैन समाज आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. राज्य सरकारने कबुतरखाना प्रकरणात तोडगा काढला नाही नाही तर दिवाळीनंतर उपोषण करण्याचा इशारा महावीर मिशन ट्रस्टने दिला आहे. त दादर येथील योगी सभागृहात मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठीच महावीर मिशनने धर्मसभेचं आयोजन केलं आहे. या सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी पालिका निवडणूक लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, शांतीदूत असलेले कबूतर हे आमचे चिन्ह असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरू. प्रत्येक वॉर्डात आमचे उमेदवार उभे राहतील. ही फक्त जैन लोकांची पार्टी नसेल, तर राजस्तान 36 समुदाय, जेवढे मारवाडी आणि गुजराती असतील ते सर्व आम्ही एकत्र येऊन नगरपालिकेमध्ये आम्ही आमचे वाघ उभे करू.Jain community
जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, मुंबईतील जैन समाज सर्व समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. आम्ही महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणगी स्वरुपात दिला. परंतु आमच्या मुद्द्यांसाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. यासाठी आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली होती. तेव्हा त्यांच्या फलकावर वाघाचे चिन्ह होते. वाघ हे माता जगदंबेचे वाहन आहे. त्यामुळेच जगदंबेचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला. आताच्या शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही.
निलेशचंद्र विजय म्हणाले की, आगामी काळात कबूतर कुणाला घेऊन बुडणार, हे परमेश्वरच सांगू शकेल. कारण आमचा पक्ष कोणत्याही एका समाजाचा नाही. आज कुत्रा, गाय सुरक्षित नाही. यानंतर तुम्ही उद्या उंदरावर याल, पण ते तर गणपतीचे वाहन आहे. परंतु माणसाने विकासाच्या नावाखाली झाडे तोडली, घरे बांधली म्हणून कबूतर बेघर झाले. पण भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून दादर आणि इतर ठिकाणी कबुतरखाने आहेत.
आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो. बाकी कोणत्याही नेत्यांना आम्ही मानत नाही, असे उत्तर निलेशचंद्र विजय यांनी अन्य एका प्रश्नाला दिले.
Dadar pigeon house controversy now turns political, Jain community warns of contesting Mumbai Municipal Corporation elections
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना