विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Ministers भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यभर ‘पालावर दिवाळी’ हा संवेदनशील आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.BJP Ministers
या उपक्रमाअंतर्गत भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी ऊसतोडणी कामगार, भटके-विमुक्त समुदाय, बांधकाम मजूर आणि इतर वंचित घटकांच्या पालावर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.BJP Ministers
राज्यभर भाजप कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या वस्त्यांवर जाऊन दिवाळी फराळ, मिठाई, कपडे आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येईल.
मुलांसाठी फटाके आणि शैक्षणिक साहित्यही देण्यात येणार आहे.
“पालावर दिवाळी” हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि समावेशकतेचा दीप आहे. भाजपने सण साजरा करण्याच्या माध्यमातून समाजातील दुर्बळ घटकांपर्यंत सन्मान, आपुलकी आणि आनंद पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहेत
BJP Ministers, MLAs, MPs, and Office Bearers to Celebrate Diwali in Villages
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा