विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. तब्बल २२ हजार ८०९ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. या प्रलंबित हरकतींची छाननी करून अचूक दुरुस्ती करणं हे महापालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे. Draft Voter Lists
महापालिकेच्या निवडणूक विभागाने यंदाच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विभागल्याचा दावा केला होता. मात्र, प्रारूप यादी जाहीर होताच या यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं उघड झालं. काही मतदारांची नावं शेजारच्या प्रभागात तर काहींची थेट वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात टाकण्यात आली होती. यामुळे महाविकास आघाडीने मतदार याद्या ‘फोडताना’ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोपही केला होता.
पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट
याद्यांमधील विसंगती वाढत गेल्याने हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगानेही तक्रारींची गंभीर दखल घेत याद्या दुरुस्त करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्य निवडणूक कार्यालय येथे हरकती दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती, आणि त्यानंतर प्रत्यक्षात हरकतींचा ढगफुटी पावसाच झाला.
सर्वाधिक हरकती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात नोंदल्या गेल्या असून त्यांची संख्या ६ हजार ३०८ आहे. त्यापाठोपाठ नगर रोड–वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात ५ हजार ६१७ हरकती नोंदविण्यात आल्या. धनकवडीमध्ये २ हजार ४७२, हडपसर–मुंढवा विभागात २ हजार १८६, कोंढवा–येवलेवाडीमध्ये १ हजार ३९७ आणि वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात १ हजार ११० हरकती नोंदल्या गेल्या. सर्वात कमी हरकती भवानी पेठ कार्यालयात असून त्या फक्त ८७ आहेत.
आता या सर्व हरकतींची तपासणी करून मतदार याद्या अचूक बनविण्याची कसरत महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.
Objections to Draft Voter Lists; Over 22,000 Complaints Hit Civic Body
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध