महाराष्ट्र गुंडांचे राज्य, लाडका कंत्राटदार ही नवी संकल्पना, विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र हे आता गुंडांचे राज्य झाले आहे. लाडका कंत्राटदार ही नवी संकल्पना राज्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया ही केवळ नावापूरतीच राहिली आहे. यातून 1 लाख 67 हजार कोटींचे कामे देण्यात आली. याचे 20 टक्के पैसे सत्ताधाऱ्यांनी कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. Vijay Vadettiwar

वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीमधील दोन्हीही घटक पक्ष हे भाजपच्या ताटाखालील मांजर बनले आहेत,ते म्हणतील तसे दोन्हीही पक्ष वागतील. त्यामुळे भाजपला कुणीही थांबवू शकत नाही. मुंबई महापौर पदावर भाजपचा माणूस बसवायचा आहे हा दिल्लीतील ‘आका’नी त्यांना आदेश दिला आहे. कुंभमेळ्याचे बजेट मलिदा खाण्यासाठी फुगवण्यात आले आहे. आपली माणसं नेमत पैसे गोळा करायचे आणि त्यातून निवडणूक जिंकायचे असे सुरू आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपने एका मतासाठी 50 हजार रुपये दिले. एका मतासाठी जर भाजप 50 हजार रुपये देत असेल तर हा देश किती लुटून खाल्ला आहे याचे ते उदाहरण आहे.



सत्तेसाठी काहीही करायचे पैसे वाटायचे आणि पुन्हा पैसे खायचे आणि देश लुटून खायचा हे सत्ताधाऱ्यांचे सुरू आहे. संपूर्ण व्यवस्था बिघडवली आहे. त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नसल्याने हिंदू-मुस्लीम, मंदिर, मशीद, भारत- पाकिस्तान असे लोकांना वाटून संविधान संपवण्याचे षड्यंत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं जीवंत आहे तो पर्यंत संविधान बदलण्याची कोणाची औकात नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महायुतीमधील दोन्हीही घटक पक्ष हे भाजपच्या ताटाखालील मांजर बनले आहेत,ते म्हणतील तसे दोन्हीही पक्ष वागतील. त्यामुळे भाजपला कुणीही थांबवू शकत नाही. मुंबई महापौर पदावर भाजपचा माणूस बसवायचा आहे हा दिल्लीतील ‘आका’नी त्यांना आदेश दिला आहे, असा टाेला वडेट्टीवार यांनी मांडला.

Maharashtra is a state of goons, beloved contractors are the new concept, Vijay Vadettiwar targets the Mahayuti government

महत्वाच्या बातम्या