विशेष प्रतिनिधी
नागपूर : State legislature राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून परंपरेप्रमाणे विरोधकांनी आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.State legislature
8 ते 14 डिसेंबर दरम्यान, अवघा एक आठवडा चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राजकीय वातावरण तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, परंपरा कायम राखत विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली, ज्यात अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते.State legislature
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित होते.
अधिवेशनासाठी आज अनेक मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, इंडिगोच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर विमानांच्या गोंधळामुळे नियोजनाचा बोजवारा उडाला. मुंबई आणि पुण्याहून येणारी उड्डाणे रद्द झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींना नाईलाजाने विमानवारी सोडून ‘समृद्धी महामार्गा’ने नागपूर गाठावे लागले आहे. तर काही नेते रेल्वेने नागपूरमध्ये दाखल झाले.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने नागपुरात जंगी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भव्य होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. विमानतळापासून विधानभवनापर्यंतच्या रस्त्यावर नेत्यांच्या स्वागताचे फलक लागले आहेत.
State legislature to convene from tomorrow, opposition boycotts tea party as per tradition
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध