संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा, एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सल्ला

विशेष प्रतिनिधी

नागपूर : लोकांनीच विरोधकांस झिडकारले आहे. त्यांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. Eknath Shinde

नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष या अधिवेशनात किती विदर्भचे प्रश्न उपस्थित करतो माहित नाही. पण सरकार सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी आम्ही त्यांना गांभीर्यानेच घेऊ. त्यांचा एकच मुद्दा सुरू आहे की विरोधी पक्ष नेता का दिला नाही?

लोकांनीच त्यांना झिडकारले आहे, त्यांची संख्याबळ कमी आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा. अडीच वर्षात जे महायुतीने काम केले त्याची फलश्रुती विधानसभेच्या निवडणुकीत मिळाले आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत.



एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारचे साडे तीन वर्ष होत आहेत. दुसऱ्या इनिंगचे हे दुसरे अधिवेशन आहे. कालावधी कमी असला तरी विदर्भच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. विरोधकांनी विदर्भावर चर्चा घडवली पाहिजे. चहापानाच्या कार्यक्रमावर तर त्यांनी बहिष्कार टाकलाच आहे. पहिल्या इंनिंगमध्ये विरोधक फार जोरात होते. सभागृहात कमी आणि बाहेर जास्त बोलत होते.

आमची एवढीच भूमिका आहे की हे अधिवेशन जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी असते, विरोधकांना यात फारसे स्वारस्य राहिले नाही. पायऱ्यांवर स्टंट मारण्यातच त्यांना धन्यता वाटते. आताचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसत आहे. त्यांची अवस्था जी आपण पाहत आहोत, त्यांचे नेते सगळे घरात आणि कार्यकर्ते वाऱ्यावर होते.

विरोधी पक्षाकडून आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी लोकांचे प्रश्न मांडावे. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेते पदावरच सवाल करतात. आम्ही विकासाचे काम पुढे नेत आहोत. आता ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा हेच म्हणत होते. थोडा अभ्यास करून बोलले पाहिजे. एकनाथ शिंदे कामातून उत्तर देत आहे. लोकांनी कामांना पोचपावती दिली आहे. आम्ही घरी बसत नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करावे आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. आधी अधिवेशनाला पूर्ण वेळ बसा आणि मग बोला, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Increase your numbers if you want the Leader of Opposition, says Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या