Bhaskar Jadhav : कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट, भास्कर जाधव यांचे सरकारला आव्हान

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Bhaskar Jadhav विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट कायद्यात कुठेही नाही. भाजप सरकारमध्ये सौजन्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही. विधिमंडळाच्या कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट आहे, हे सरकारने दाखवावे, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  यांनी दिले आहे.



विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. याआधी दोन अधिवेशने झाली आता फडणवीस सरकारचे तिसरे अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद मिळणार का, असा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. यावर शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  यांनी म्हटले आहे की, विरोधी

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपकडे 10 टक्के सदस्य संख्या नसताना विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यामुळे भाजपला घेताना अटींची आठवण होत नाही, मात्र देताना त्यांना सर्व नियम आणि अटी लक्षात येतात, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

भास्कर जाधव म्हणाले की, भाजपकडे पाशवी बहुमत असूनही हे सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारच्या काळात अनेकदा विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे. एक नाही तर मी अनेक नावं सांगू शकतो. ज्यांच्याकडे 10 टक्के सदस्य संख्या नसताना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र भाजपला लोकशाहीच मान्य नाही, त्यामुळे ते लोकशाहीतील प्रथा आणि परंपरा पायदळी तुडवत आहेत.

भास्कर जाधव यांच्या आक्रमक मागणीवर टोला मारताना मंत्री उदय सामंत म्हणाले, या अधिवेशनात महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करता येईल ते नक्की केले जाईल. विरोधकांच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल विरोधकांनी सकारात्मक सूचना केल्या तर महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रतिसाद त्याच्या सुचना ऐकल्या जातील. मात्र, विरोधकांनी एकदा आपले संख्याबळ तपासावे. भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचा दांडगा अनुभव आहे. त्यांना शिवसेना उबठा ने फक्त पत्र देऊन ठेवले आहे. मात्र खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते करण्याची वेळ येईल तेव्हा काय होईल ते समोर येईलच.

Bhaskar Jadhav Challenges Govt. to Cite Rule Requiring 10 Percent Strength for Leader of Opposition

महत्वाच्या बातम्या